Powered By Blogger

Monday, April 2, 2012

ट्राफीक पोलीस बरोबर चा मजेदार किस्सा

ट्राफीक पोलीस बरोबर चा मजेदार किस्सा:
तारीख: ३० मार्च २०१२.
वेळ: संध्याकाळी ८.००

संध्याकाळची ट्राफीक ची वेळ. अंधेरी – कुर्ला रोड च्या त्या प्रचंड कंटाळा आणणाऱ्या गर्दी मुळे बराच घामाघूम झालो होतो आणि वैतागलो हि होतो (एकाच जागी बाईक उभी राहून आणि बाजूच्या गाडयांचा धूर खाऊन). मरत मरत कुर्ला L.B.S Road च्या सिग्नल ला पोचलो तेंव्हा शेवटी कंटाळून मी हेल्मेट काढून हातात घेतलं. नेहमी प्रमाणे कानाला Headphones होते (गरज असते याची, इतक्या प्रमाणात ऑफीसचे Phone Calls येतात कि नाईलाजाने वापर करावाच लागतो....इतर वेळी गाणी ऐकायची आणि Phone Call आला कि बाईक बाजूला लावून Call attend करायचा).

सिग्नल वरून Right मारून L.B.S. Road ला लागायचं होतं. बाजूने अचानक एक हवलदार साहेब आले (नंबर १). त्यांनी माझ्या हेल्मेट मधून लटकणारा Headphone चा एक earpiece स्वतः च्या कानाला लावला; आणि म्हणाले “ वा, संगीत ऐकताय वाट्तं; बाजूला गाडी घ्या साहेब”. असं म्हणून लगेच मागच्या सीट वर सवार झाले. मी म्हणालो “ समोरच्या बाजूला लावू का गाडी ?” लगेच साहेब “ कशाला ? चौकी इथे मागेच आहे, या बाजूला लावा”. आधीच उशीर झाला होता; रेश्मा ला घेऊन पुढे चेम्बुर पर्यंत जायचं होता. मनात म्हटल “ वाट लागली आता”.

गपचूप बाईक लावली चौकी च्या बाहेर. साहेब नं १ license घेऊन आत पसार झालेले होते. मी बाहेर फुटपाथ वर थांबलो. एक मनुष्य बाहेर बाईक च्या बाजूला उभा होता (साहेब नं २). त्याने डायरेक्ट सांगून टाकल “जाऊन दे रे”. तेवढ्यात मला नेहमी प्रमाणे ऑफिस मधुन Call आला. attend करून परत मी मागे आलो. साहेब नं १ चौकी मधून आले आणि म्हणाले “ साहेब, आत या”. मी त्यांच्या मागून आत गेलो.
त्यांनी रीतसर एक कागद काढून दाखवला. त्यात लिहिल होतं – गाडीवर असताना मोबाइल गेम खेळणे, SMS करणे, बोलणे हा गुन्हा आहे.

मी : यात गाणी ऐकण हा गुन्हा आहे असं कुठे लिहिल आहे ?
साहेब नं १ : ते कलम वेगळ आहे, तुम्ही कोर्टात जाऊन विचारू शकता.
मी : तुम्ही Fine मारणार रस्त्यावर, आणि का मारला ते विचारायला आम्ही कोर्टात का म्हणून जायच. कायदा तुम्ही इथे दाखवला पाहिजे. हा कायदा नुसता कोर्टात ठेवून काय कामाचा ?
साहेब नं १ : ते तुम्ही काय ते कोर्टात जाऊनच विचारा.
मी : हा चुकीचा कायदा आहे.
दोघांची हि चर्चा जोर-जोरात चालू होती. दोघेही हसत होतो; पण आवाज जरा जास्त होता.
साहेब नं १ : तुम्ही इंजीनिअर आहात काय ?
मी : हो, का पण ? तुम्ही असं का विचारताय ?
साहेबानी माझी डायरेक्ट विकेट काढली. म्हणाले....
साहेब नं १ : साहेब, इंजीनिअर लोकच असे मुद्या वरून भांडतात.
साहेब नं १ : fine भरावा लागेल.
मी : एक काम करा, License जमा करा, पैसे भरायाचेचं असतील तर पूर्ण भरतो ना. सरकार ला तरी मिळूदेत.
साहेब नं १ : बघा आता; तुम्हीच काय ते ठरवा.
मी : मी काय ठरवाणार, License तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल तसं. तुम्हाला मराठी म्हण माहीत आहे ना “ ज्याच्या खातात काठी तो पारधी”.
आवाज वाढून चर्चा चालू होती. ते ऐकून बहुतेक साहेब नं २ बाहेरून आंत आले. वयाने बहुतेक माझ्या जवळपास, पण शरीराने एकदम पोलिसी.

साहेब नं २ : अरे कशाला भांडताय ?
मी : भांडत नाहीये, चर्चा चालू आहे, विचारा या साहेबांना.
साहेब नं २ : अरे त्याचं license देऊन टाक. जाऊन दे त्याला.
साहेब नं १ : हे घ्या आणि जा.
मी : असाच जाऊ ? fine नाही भरायचा का ?
मी bag उघडून २०० रुपये काढले आणि त्याला देऊ लागलो.

साहेब नं १ : झालं का ? आम्ही जा संगतोये आणि तुम्ही?? काय हे ??
मी : असाच जाऊ ? खरा नाही वाटला म्हणून देत होतो.
साहेब नं २ : खरच जा तू. “ अरे आपला माणूस ओळखतो आम्ही, Fine मारायला अजून बरीच माणसं आहे रे बाहेर दुनिये मध्ये”.
मी : धन्यवाद, येतो मी.
हेल्मेट उचलून मी निघायला तयार झालो.
साहेब नं १ : बाईक बाकी मस्त आहे हा साहेब तुमची. त्रास नाही का होत चालवायला.
साहेब नं २ : राहायला कुठे ?
मी : कोपरखैरणे.
साहेब नं २ : आणि ऑफिस कुठे आहे रे तुझं ?
मी : साकीनाका.
साहेब नं १ : बापरे, मग रोज ऐवढ अंतर बाईक वरून ?
मी : साहेब; Train किंवा Bus या पैकी कोणत्या वाहनाने आपण कोपरखैरणे हून साकीनाक्याला सव्वा तासात पोचाल का ?
साहेब नं १ : नाही.
मी : मग, तेच तर आहे ना, मी पोचतो बाईक वरून.
तिथेच बसलेले अजून एक हवालदार, हेही वयाने माझ्या जवळ पासचेच
साहेब नं ३ : मग कुर्ल्याला बाईक ठेऊन द्यायची ना, आणि इथून मग ट्रेन ने जायचं घरी.
साहेब नं २ : मग आत्ता इकडे कुठे निघालायास ?
मी : चेम्बुर ला जायचंय पार्टी आहे.
साहेब नं २ : अरे मग इथे कशाला आलास, डायरेक्ट घाटकोपर वरून जायच ना.
मी : साहेब, बायको ला कुर्ल्या हून घ्यायचा आहे.
साहेब नं २ : काय सांगतोस ? लग्न झाल्या सारखा वाटत नाही.
मी हसून bag उचलली.

साहेब नं २ : (हसत हसत – त्यांना वाटल, मी परत काही तरी काढतो आहे bag मधून )अरे नको नको.
मी : नको नको काय, माझ्या कडे काहीही proof नाहीये माझं लग्न झाल्याचं. मंगळसूत्र घालत नाहीत ना पुरुष.
सगळे हसत होते.....माझ्या सकट.

अचानक
साहेब नं १ : तरीच तुम्हाला सांगणार होतो. मघाशी तुम्ही सिग्नल ला हेम्लेत काढलात ना. तुम्हाला बघितल ना तेंव्हा एकदम वाटल Brett Lee ला बघितल्या सारख.
मी एकदम खुश.

साहेब नं २ : कोणत्या कंपनी मध्ये कामाला आहेस ?
मी : Vodafone मध्ये आहे.
मी उगाचच आपल गम्मत म्हणून माझं एक Visiting Card त्यांना दिलं. आणि म्हणालो
मी : मला माहिती आहे तुम्हा पोलिसांची phone ची स्कीम LOOP Mobile ची आहे ते, महितर काही तरी मदत केली असती.
साहेब नं ३ : बघा काहीं तरी Free स्कीम असेल तर सांगा.
मी : जिथे आम्हाला सुद्धा बिल भाराव लागतं तिथे तुम्हला कशी काय मिळाणार Free स्कीम.
साहेब नं ३ : काय सांगताय !! तुम्हाला Free नाही ??
मी : नाही ना. फक्त ऑफिस चे कॉल्स Free असतात आम्हाला.
मी :साहेब निघू का ? जरा उशीर होतोय जायला ??
साहेब नं २ : हो हो , निघा. माझं नाव XXX XXX. कधीही काही मदत लागली तर या नक्की.

मी शेवटी एकदाचा खुश होऊन निघालो.


· या वरच्या गमतीशीर संवादा मधला एकहि संवाद काल्पनिक नाही.

(नाव आणि पोलीस चौकी च्या जागे चा उल्लेख मुद्दामून गुप्त ठेवला आहे.)
परत एकदा भेटायला नक्कीच जाईन XXX XXX साहेबानां.